Tuesday, 23 August 2016

Arey Maaj kashacha?..

 जन्म दिला दुसऱ्याने 
जाताना खांदाही दुसऱ्याचा ;
मग माज कशाचा ?

बोलणं शिकवलं दुसऱ्याने 
चालणं शिकवलं दुसऱ्याने 
जगण्यात मोठा वाटा दुसऱ्याचा 
मग माज कशाचा ?

मैत्री निभावली दुसऱ्याची 
प्रेम केलं दुसऱ्यावर ,
हाथ पकडून दुसऱ्याचा 
आयुष्य घालवलं मोलाचं 

पगार दिला दुसऱ्याने 
रोजगार दिला दुसऱ्याने 
संसार झाला सुखाचा 
मग माज कशाचा ?.. 

No comments:

Post a Comment