एकटेपणाची सवय न्यारी ,
कधी वाटतं उदास ,
तर कधी लइ भारी !
आपण कोण आहोत याचा होतो भास् ,
पण कोणी नाही याचाही होतो त्रास !
दिवस निघुन जातात,
रात्र पलटून जाते;
भल्या मोठ्या या विश्वात,
एकटेपणाची सवय लागते !
विचारांशी तगड़ी मैत्री जमते,
माणसात यायला वेळ लागतो;
सुन्या सुन्या आठवणीत मी रमते,
नाती परत जोडायला वेळ लागतो !
खच्च भरलेली मैफिल ,
खोलीतला तो अंधार ;
एकटेपणाने भिजलेले अश्रु,
आणि खोट्या हास्याचा हाहाकार !
एकटेपणाची सवय न्यारी ,
कधी वाटतं उदास ,
तर कधी लइ भारी !
कधी वाटतं उदास ,
तर कधी लइ भारी !
आपण कोण आहोत याचा होतो भास् ,
पण कोणी नाही याचाही होतो त्रास !
दिवस निघुन जातात,
रात्र पलटून जाते;
भल्या मोठ्या या विश्वात,
एकटेपणाची सवय लागते !
विचारांशी तगड़ी मैत्री जमते,
माणसात यायला वेळ लागतो;
सुन्या सुन्या आठवणीत मी रमते,
नाती परत जोडायला वेळ लागतो !
खच्च भरलेली मैफिल ,
खोलीतला तो अंधार ;
एकटेपणाने भिजलेले अश्रु,
आणि खोट्या हास्याचा हाहाकार !
एकटेपणाची सवय न्यारी ,
कधी वाटतं उदास ,
तर कधी लइ भारी !
No comments:
Post a Comment